Download Retirement Speech in Marathi PDF
You can download the Retirement Speech in Marathi PDF for free using the direct download link given at the bottom of this article.
Retirement Speech
Retirement is an occasion in the life of some people where even words are not enough to speak because in such a time we are in a hurry to express all kinds of emotions and that is why these emotions arise. At that time, the person has some thoughts in front of his eyes, both happy moments and sad moments. You have to thank everyone present during your tenure and anyone who has been a part of your journey. Students are asked to write a farewell speech on the occasion of retirement. Here we are giving you four types of speeches and you can choose any one of them as per your requirement.
Retirement Speech in Marathi
आदरणीय अतिथी माझे सहकारी आणि सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
XYZ या कंपनीत जवळपास दहा वर्षे कार्य करून मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण घालवले आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी प्रत्येक कार्यात मला साथ देत माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. आज आपली ही कंपनी उच्च आणि लाभदायक स्थितीमध्ये आहे आणि तुम्हा सर्वामुळे व्यवस्थापित आहे. म्हणून आज सेवानिवृत्ती चे भाषण देतांना मलाही वाटत आहे की मला सेवानिवृत्त होण्यासाठी ही वेळ योग्य आहे. आता अन्य तरुण मंडळी तसेच मेहनती सहकाऱ्यांनी पुढे येऊन या कंपनीचे कामकाज सांभाळायला हवे.
तुम्हा सर्वांसोबत घालवलेल्या कार्यकाळात मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. या गोष्टींनी माझ्या व्यावसायिक तसेच खाजगी जीवनात खूप मदत केली. आपल्या या कंपनीत माझे भरपूर मित्र बनलेत ज्यांनी वेळोवेळी माझी सहायता केली. या सर्व मित्रमंडळी कडून मी वेळेचे महत्त्व, इमानदारी, कामाचे कौशल्य आणि टीम वर्क सारख्या अनेक गोष्टी शिकलो. आम्ही सर्वांनी टीम वर्क मध्ये कार्य करूनच कंपनीला आजचे हे यश मिळवून दिले आहे. आम्हा सर्वांच्या समर्पण आणि प्रेरणेमुळेच कंपनीला खूप सारे पुरस्कार मिळाले आहेत.
माझे एकच स्वप्न आहे की आपली ही कंपनी दिवसेंदिवस यश मिळवित राहो. XYZ कंपनीला आपले सर्व कर्मचारी आणि ग्राहकांवर गर्व आहे.
मी तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इच्छा करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात यश प्राप्त करो. कंपनीतील तरुण मंडळींना भविष्यात शिकण्यासाठी खूप काही आहे. म्हणून आपले लक्ष नेहमी कामावर केंद्रित असू द्या. भविष्यात तुम्ही नक्कीच यश प्राप्त करणार… धन्यवाद!
Retirement Speech in Marathi PDF Download Link
[download id=”18495″ template=”dlm-buttons-new-button”]